नागरिकांकडून पत्रे स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय, मुंबई येथे 'मध्यवर्ती टपाल केंद्रा चे उद्घाटन केले.
2 / 6
शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
3 / 6
मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात आलं
4 / 6
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीही केंद्राची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.
5 / 6
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात आले आहे.
6 / 6
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी हे टपाल केंद्र उभारण्यात आले आहे.