ट्रॅव्हिस हेड 174 चेंडूत 163 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 1 षटकार मारला. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला आपला बळी बनवले.
3 / 6
स्टीव्ह स्मिथने आपल्या करियर मधील 31 कसोटी शतक झळकावले. तो 121 धावाकरून माघारी परतला. त्याला शार्दूल ठाकूरने बोल्ड केले.
4 / 6
ऑस्ट्रेलियाचे टॉप-3 फलंदाज बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आघाडी घेतली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी त्रासले होते. ट्रॅव्हिसने पहिल्या दिवशी शतकाचा टप्पा ओलांडला. त्याचवेळी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात स्टीव्ह स्मिथने शतक पूर्ण केले.
5 / 6
तत्पूर्वी, सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नरसह मार्नस लबुशेन 76 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते, मात्र यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात विक्रमी भागीदारी झाली.
6 / 6
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद सिराजला, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.