जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात आज रविवार (दि. २० एप्रिल)रोजी पहाटे झालेल्या ढगफुटीने संपूर्ण परिसर धोकादायक परिस्थितीत गेला आहे.
मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थितीमुळे किमान तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक घरं व वाहनं भूस्खलनात गाडली गेली आहेत.
नाशरी ते बनिहाल दरम्यान जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (NH-44) वर सुमारे एक डझन ठिकाणी भूस्खलन आणि मातीची झडप पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
रामबनच्या धरम कुंड गावात अचानक आलेल्या पूरामुळे जवळपास 40 घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे.