करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण' च्या 8 व्या सीझनच्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. नवीन एपिसोडमध्ये कपूर सिस्टर म्हणजेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर एकत्र दिसणार आहेत.
2 / 6
या प्रोमोमध्ये जान्हवी आणि खुशी त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. एका बाजूला जान्हवी रेड कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे, तर दुसरीकडे तिची बहीण खुशी ऑलिव्ह ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
3 / 6
प्रोमोमध्ये करण जोहर जान्हवी आणि खुशीला एकामागून एक अनेक वैयक्तिक प्रश्न विचारताना दिसत आहे. रॅपिड फायर राउंड दरम्यान जान्हवी आणि खुशी त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे करताना दिसत आहेत.
4 / 6
जेव्हा करणने जान्हवीला विचारले की तिने तिच्या मोबाईलमध्ये स्पीड डायलवर सेव्ह केलेले तीन लोकांचे नंबर कोणते? या प्रश्नाच्या उत्तरात जान्हवीने पहिल्या क्रमांकावर तिचे वडील बोनी कपूर यांचे नाव घेतले.
5 / 6
जान्हवीने तिची बहीण खुशी कपूरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर घेतले. तिसर्या क्रमांकावर तिचा कथित प्रियकर शिखर पहाडियाचे नाव घेतले.
6 / 6
जान्हवी कपूरला अनेकदा शिखर पहाडियासोबत अनेक कार्यक्रम आणि धार्मिक स्थळी स्पॉट केले गेले आहे.