न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली.
2 / 7
राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना शपथ दिली. हा शपथविधी सोहळा राजभवनामध्ये संपन्न झाला.
3 / 7
या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
4 / 7
या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
5 / 7
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे 30 मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी उपाध्याय यांची सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शिफारस केली होती.
6 / 7
हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्तीचं हस्तांदोलन करून अभिनंदन केलं.
7 / 7
न्यायमूर्ती उपाध्याय यांची 21 नोव्हेंबर 2011 रोजी देशातील सर्वात मोठ्या अशा अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पदभार सांभाळला होता.