Download App

Ram Mandir Ayodhya: पाऊले चालती अयोध्येची वाट! कंगणाने घेतली बाबाची भेट, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 7

अयोध्येत आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशातील अनेक सेलिब्रिटींची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असणार आहे.

2 / 7

दरम्यान, या सोहळ्यासाठी अभिनेत्री कंगणा रणौत एक दिवस अगोदरच पोहोचली होती. अयोध्येत पोहोचल्यानंतर ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवत आहे.

3 / 7

कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली आहे.

4 / 7

कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली आहे.

5 / 7

अयोध्येतील धर्मगुरुंची कंगणा रणौत भेट घेतना पाहायला मिळत आहे. तिने राम भद्राचार्य यांची भेट घेतली. या शिवाय तिने प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरात जात दर्शन घेतले. त्यानंतर ती मंदिरात जाऊन साफ सफाई करतानाही दिसली आहे.

6 / 7

कंगणाने अयोध्येतील फोटो शेअर करताना लिहिले की, "पहिल्यांदा वयाने लहान असलेला गुरु भेटला. माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे.

7 / 7

मनाला वाटले तर लहान भावाप्रमाणे मिठू मारु. नंतर लक्षात आले की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"

follow us