Download App

Kartiki Ekadashi 2023 : महापूजेनंतर फडणवीस दाम्पत्याकडून पंढरपुरात विकास कामांचं भूमिपूजन; पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 6

Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली.

2 / 6

त्यानंतर फडणवीस दाम्पत्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचं विधिवत पूजा करत भूमिपूजन केलं.

3 / 6

यामध्ये कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजूर केलेल्या ₹73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील ₹26 कोटींच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

4 / 6

यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.

5 / 6

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री सुरेश खाडे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.

6 / 6

या भूमिपूजन कार्यक्रमाचे फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट करत त्याबद्दल माहिती दिली.

Tags

follow us