भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
2 / 6
त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे.
3 / 6
पंकजा मुंडेंना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तिन्ही मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर आले होते.
4 / 6
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही तिघेही गोपीनाथ गडावर आलो, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ताईला उमेदवारी मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या वेशीवरच ताईंचे स्वागत करणार होतो.
5 / 6
तर पंकजा म्हणाल्या, मी लोकसभेची उमेदवार आहे. म्हणूनच मी आज गोपीनाथ गडावर आले आहे. मी ठरवलं होतं की, माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. आमच्या काकींचे आणि अण्णांचे आशिर्वाद घ्यावेत. मात्र धनंजय यांनी सांगितलं की, तेच गोपीनाथ गडावर येत आहेत.
6 / 6
पुढे त्या म्हणाल्या, मी येथे माझ्या भावाला भेटले पण मी घरी जाऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटणार आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन. आज माझं लोकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. आज माझ्या स्वागताला जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार प्रतिमा मुंडे आलेत. विचार करा, मी किती तगडा उमेदवार आहे.