Download App

Photo’s : उपमुख्यमंत्रापदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार मंत्रालयात; मंत्रिमंडळ बैठकही पार पडली

1 / 8

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आले

2 / 8

अजित पवारांसह सहकारी मंत्र्यांनी महामानवांना अभिवादन केले

3 / 8

त्यांनी मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतीमेस पुष अर्पण करून अभिवादन केले,

4 / 8

यावेळी त्यांच्यासोबत सहकारी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अदितीताई तटकरे, मंत्री संजय बनसोडे, मंत्री अनिल भाईदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

5 / 8

अजित पवारांच्या समर्थक आमदारांसह शिवसेना व भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडली.

6 / 8

नवीन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार या बैठकीत उपस्थित होते.

7 / 8

यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

8 / 8

उपरोधाची बाब म्हणजे सरकारच्या पहिल्या वर्षात जे अजित पवार विरोधीपक्ष नेते म्हणून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत होते, आता तेच सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

Tags

follow us