अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे.
नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय.
अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय.
दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय.
सर्व फोटो / श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या सोशल मीडियावरून साभार