Download App

Devendra Fadnavis Photos : शासन आपल्या दारीनंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साई चरणी लीन

1 / 8

अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

2 / 8

या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मंत्री दीपक केसरकर यांनी साईबाबा मंदिराला भेट दिली.

3 / 8

यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री या सर्वांचे स्वागत केले.

4 / 8

शिर्डी येथील जगप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिराला भेट दिली. या शुभ प्रसंगी मला श्री साईबाबांची पूजा करण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी सर्वांचे स्वागत केले. असं फडणवीस म्हणाले.

5 / 8

यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करु”, असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना इशारा दिला.

6 / 8

मोदींना विरोध करण्यासाठी देश पातळीवर सगळे एकत्र आले आहेत. सगळ्यांनी एकत्र येत खिचडी केली आहे. त्या खिचडीचा काही उपयोग आहे का? असा सवाल अजित पवारांनी केला.

7 / 8

सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले. अजित पवार ही सरकारमध्ये आले. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले.

8 / 8

सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे उपस्थित आहेत, अशा शब्दांत विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

Tags

follow us