Photos : फक्त मराठी सिने सन्मान सोहळा दिमाखात संपन्न
shruti letsupp
WhatsApp Image 2023 09 18 At 3.43.08 PM
फक्त मराठी सिने सन्मान सोहळा दिमाखात संपन्न झाला. यंदा या सोहळ्याचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या या रंगतदार सोहळ्यात कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले.
‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गीत आणि ‘महाराष्ट्र शाही’र चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीतासाठी गौरविण्यात आला. या दोन्ही चित्रपटांसाठी अजय आणि अतुल यांना सन्मानित करण्यात आले.
बॉलीवूडमधले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीला मानवंदना देत त्यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाला या सोहळ्यात विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शनासाठी केदार शिंदे तर अभिनयासाठी अंकुश चौधरी याचा गौरव यावेळी करण्यात आला.
प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार आणि त्याला मिळणारी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद यामुळे हा सोहळा नेत्रदीपक झाला.