कलर्स मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रदर्शित झालेली नवी मालिका 'अंतरपाट' ही चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून रसिकवर्ग नव्या मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत.
2 / 6
सध्या या मालिकेत रश्मी अनपट आणि अशोक धगे म्हणजेच आपले गौतमी आणि क्षितिजचे लवकरच लग्न पार पडणार असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
3 / 6
गौतमी आणि क्षितिज यांच्या लग्नाचा हा अद्वितीय महासप्ताह कलर्स मराठीवर आपल्याला दिसणार असून त्याची सुरुवात देखील झाली आहे.
4 / 6
ट्रेंडिंगच्या नावाखाली केले जाणारे विविध प्रकार, या सगळ्या गर्दीमध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव जपणारे सुंदर असे लग्न म्हणजे कलर्स मराठीवरील 'अंतरपाट' या मालिकेमधल्या क्षितीज आणि गौतमीचे लग्न.
5 / 6
या सगळ्यात ऐकायला येतील मराठी लोककलेची लोकगीते जी प्रत्यक्षात लोककलाकार सादर करतील. म्हणजे केवळ बघण्यातच नाही तर ऐकण्यात सुद्धा पारंपारिक वैभव झळकत आहे.
6 / 6
आजच्या ट्रेडिंगच्या काळात महाराष्ट्राची परंपरा सांगणारी 'अंतरपाट' या मालिकेतील गौतमी - क्षितिज यांचा लग्न सोहळा पाहायला विसरू नका..!