Download App

Photos : मुंडे बंधू-भगिनी अन् फडणवीस जुगलबंदी जमली पाहा फोटो….

1 / 7

आज (5 डिसेंबर) बीडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिणी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या.

2 / 7

यावेळी भाजपमध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि इतके दिवस त्यांचे विरोधक असलेले धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर करत दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला.

3 / 7

आज या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंडे पण आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो. की, असेच एका व्यासपीठावर राहा. आमच्या तिघांची म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजित पवार ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की, परळी असेल बीड असेल काहीही पायाहायची गरज नाही. ताई आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. तसेच तुम्ही जर एकत्र राहिलात तर परळी बीड आणि महाराष्ट्राचं कल्याण होईल. त्यामुळे हा मंच असाच आम्हाला दिसत राहिलं हा विश्वास व्यक्त करतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

4 / 7

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यक्रमाच्या स्टेजकडे पाहून गर्मी उकाडा वाढला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर आले आहेत, असं म्हणत राजकीय टोलेबाजी केली.

5 / 7

यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी देखील धनंजय मुंडे यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, अजित पवार म्हणाले, बीडच्या पाणीप्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना आखली असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. विरोधाला विरोध करुन चालणार नाही, राजकीय जीवनात कुणीही कायमचा शत्रू नसतो, शेवटी राज्याचा विकास महत्वाचा असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

6 / 7

दरम्यान पंकजा आणि धनंजय मुंडे या भावाबहिणीचा राजकीय संघर्ष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. मात्र जसे अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले तसे या दोघा बहीणभावांचे संबंध बदलू लागले आहेत.

7 / 7

दोघांनीही या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूीन एकमेकांची स्तुती केली. बीडच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा जणू काही शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला.

Tags

follow us