Download App

PM Modi Dubai Visit: नरेंद्र मोदींच्या दुबई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

1 / 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एक दिवसीय दौऱ्यावर पोहोचले आहेत.

2 / 10

पंतप्रधान मोदींनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची राष्ट्रपती भवन 'कसर अल वतन' येथे भेट घेतली.

3 / 10

दोन्ही देशांनी आपापल्या चलनात व्यापार सुरू करण्यास सहमती दर्शवल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले.

4 / 10

पीएम मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे 85 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. आम्ही लवकरच 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे लक्ष्य पूर्ण करू.

5 / 10

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली अबू धाबीमध्ये कॅम्पस उघडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शिक्षण मंत्रालय आणि अबू धाबीच्या शिक्षण आणि ज्ञान विभागासोबत या उद्देशासाठी एक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला.

6 / 10

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, आयआयटी दिल्लीचा अबू धाबी कॅम्पस जानेवारी 2024 पासून पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पुढील वर्षी सप्टेंबरपासून पदवी अभ्यासक्रम सुरू करेल.

7 / 10

भारत हा UAE चा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. द्विपक्षीय व्यापार $84 अब्ज पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, UAE हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

8 / 10

UAE हा भारतासाठी कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आणि LNG आणि LPG चा दुसरा सर्वात मोठा स्रोत आहे.

9 / 10

2015 पासून पंतप्रधान मोदींचा आखाती देशाच्या पाचवा दौरा आहे. यामध्ये त्यांनी UAE चे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा केली.

10 / 10

भारतीय समुदाय UAE मधील सर्वात मोठा समुदाय आहे आणि देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 30 टक्के आहे.

Tags

follow us