X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Pm Modi Fly In Sky With The Tejas Fighter Jet See Photo Gallery
PM Modi यांनी तेजस विमानातून मारला आकाशात फेरफटका, पाहा फोटो
Written By:
shruti letsupp
Last Updated:
November 25, 2023 / 02:43 PM IST
1
/ 6
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बंगळुरूत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या फॅसिलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस (Tejas Aircraft) या लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला.
2
/ 6
या अनुभवाबद्दल मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत लिहीले की, “तेजसमधून यशस्वी उड्डाण केले. हा अनुभव समृद्ध अन् आश्चर्यचकीत करणारा होता. यामुळे आपल्या देशाच्या क्षमतेवरचा विश्वास आणखी वाढला. माझ्या मनात देशाच्या क्षमतेबद्दल अभिमान आणि नवी आशा निर्माण झाली. भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन.” असं मोदी म्हणाले.
3
/ 6
मोदी सरकार मागील काही वर्षांपासून संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहे. भारतात संरक्षण उपकरणांच्या निर्मिती आणि निर्यातीला कशाप्रकारे प्रोत्साहन दिले जात आहे, याबद्दल सरकारने अनेकदा अधोरेखित केले आहे.
4
/ 6
अनेक देशांनी तेजस हलके लढाऊ विमान खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात यूएस डिफेन्स कंपनी GE एरोस्पेसने MK-II तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी HAL सोबत करार केला होता.
5
/ 6
तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. त्याला लिफ्ट म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर म्हणतात. याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात, म्हणजे गरज पडल्यास त्यावर हल्ला केला जाऊ शकतो.
6
/ 6
हवाई दलाने एचएएलकडून 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली असून, त्यापैकी 26 विमाने देण्यात आली आहेत. हे सर्व तेजस मार्क-1 आहेत. येत्या काही दिवसांत, एचएएल या विमानांच्या अधिक श्रेणीसुधारित आवृत्त्या हवाई दलाला सुपूर्द करेल, 2024 ते 2028 दरम्यान ते वितरित केले जातील.
Tags
follow us
ताजी बातमी
Assembly Election : हम सत्ता में रहना चुनेंगे! सत्तेच्या स्पीचवर प्रकाश आंबेडकरांनीही चेंडू टाकला…
37 mins ago
मोठी बातमी! माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या; अन्यथा..विनोद तावडेंची काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांना नोटीस
48 mins ago
सट्टाबाजारात देवेंद्र फडणवीस फेव्हरेट! महायुतीला 1 रूपयाला 45 पैसे भाव, महाविकास आघाडीला किती भाव?
1 hour ago
Assembly Election : एक्झिट पोल आहेत, एक्झॅट नाहीत, आम्हीच सत्ता स्थापन करणार; वडेट्टीवारांनाही फुल्ल कॉन्फिडन्स…
2 hours ago
बहुमत न मिळाल्यास भाजप सरकार कसं स्थापन करणार? महायुतीचा ‘प्लॅन बी’ तयार
2 hours ago