Download App

PM Modi In Pune : मोदींचे पुण्यात आगमन ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, पाहा खास फोटो

1 / 9

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच दोन मेट्रो मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी मोदींचा पुणे दौरा सुरू झाल्यापासूनचे काही खास फोटो पाहूयात...

2 / 9

पुणे विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस देखील होते.

3 / 9

पुणे विमानतळावर मोदी यांचं आगमन झालं तेव्हा तर मोदींनी शिंदेंसह अजित पवार यांच्या हातात हात देत हस्तांदोलन केलं.

4 / 9

त्यानंतर मोदींनी पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तेथे त्यांनी गणपतीला अभिषेक देखील केला.

5 / 9

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी एस.पी. महाविद्यालयात दाखल झाले.

6 / 9

यावेळी व्यासपीठावर येताच मोदींनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा पवारांनी मोदींच्या पाठिवर प्रेमाची थापही मारली.

7 / 9

मोदींसोबत स्टेजवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यपाल बैस. तर राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका व्यासपीठावर उपस्थित होते.

8 / 9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शरद पवारांची भाषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले.

9 / 9

pm narendra modi

Tags

follow us