PM Modi Shirdi Visit : साईंचं दर्शन ते निळवंडेचे लोकार्पण मोदींच्या नगर दौऱ्याचे काही खास क्षणचित्रे पाहा…
shruti letsupp
PM Modi Speech
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शिर्डी येथील साईंचे दर्शन घेतले. मोदी यांनी साईबाबा समाधी मंदिरात(Saibaba Temple) दर्शन घेत साईंची पूजा केली. तेथून आपल्या दौऱ्याची सुरूवात केली.
त्यानंतर अकोले (Akole)तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजनासाठी मोदी रवाना झाले. सुरवातीला पीएम मोदींनी निळवंडे धरणाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली.
यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले.
मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आज शिर्डीत जिल्ह्याभरातून तसेच अनेक ठिकाणाहून मोठी गर्दी झाली. मोदी आज शिर्डीत असल्याने शिर्डीला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.