मराठी मनोरंजन विश्वात सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी सध्या बोहल्यावर चढत आहेत.
2 / 6
नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी त्यांना चाहते शुभेच्छा देत आहेत. काही वर्ष डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दगडूला खऱ्या आयुष्यातील प्राजू मिळाल्याने चाहते देखील खूप खूश आहेत.
3 / 6
दोघांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेत प्रथमेश आणि क्षितीजा लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच 14फेब्रुवारीला प्रथमेश आणि क्षितीजाने साखरपुडा केला होता.
4 / 6
लग्नासाठी प्रथमेशने गुलाबी रंगाचं धोतर, पांढरा कुर्ता आणि फेटा असा पारंपरिक लूक केला होता. तर क्षितीजा पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत नटली होती. डोक्यावर अक्षता पडताच त्या दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले.
5 / 6
कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रथमेश आणि क्षितीजाचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत.
6 / 6
'टाइमपास' सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश परबची गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. आता अखेर प्रथमेश गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत बोहल्यावर चढला आहे.