आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे 62 वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होणार आहे. 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 900 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवणार आहेत.

