इजिप्तच्या ऐतिहासिक अल-हकीम मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पाहा फोटो
letsupteam
Egypt
पंतप्रधान मोदींनी कैरो येथील इजिप्तच्या ११व्या शतकातील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीला भेट दिली.
मशीद 1012 मध्ये बांधली गेली. अल हकीम मशीद ही कैरोमधील चौथी सर्वात जुनी मशीद आहे.
मशीद 13,560 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधलेली आहे, मशिदीच्या आतील प्रांगण 5,000 चौरस मीटर आहे.
भारतातील दाऊदी बोहरा समुदायाने या मशिदीचा जीर्णोद्धार केला आहे.
नरेंद्र मोदी यांना अनेक भेटवस्तूही देण्यात आल्या.
मशिदीच्या भिंती आणि दारांवरील कोरीव कामांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
ऐतिहासिक मशिदीचे नाव 16व्या शतकातील फातिमिद खलीफा अल हकीम बामिर अल्लाह यांच्या नावावर ठेवण्यात आले होते आणि दाऊदी बोहरा समुदायासाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे.
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होण्याआधीच दाऊदी बोहरा समाजाशी खूप चांगले संबंध आहेत.
नरेंद्र मोदी यांनी मशिदीच्या भव्य वास्तू आणि नक्षीकामाचेही निरीक्षण केले.