Samantha baby bump लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
shruti letsupp
Samantha Baby Bump
लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यात तिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले असून
त्यामध्ये ती मिरर सेल्फी घेताना बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीचा काळ अनुभवत असल्याचे सांगितले जात आहे.
या खास काळातील क्षण ती चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असून, तिच्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
फोटोंमध्ये सामंथाचा प्रेग्नन्सी ग्लोही विशेष लक्षवेधी ठरत आहे. चाहते तिच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत असून, तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वासाठी शुभेच्छा देत आहेत.