Kalki 2898 AD च्या इव्हेंटला दिपिकाची बेबी बंम्पमध्ये हजेरी; प्रभासने दिला हात; पाहा फोटो
Kalki 2898 AD या चित्रपटाच्या रिलीजच्या अगोद मोठा इव्हेंट पार पडला. यामध्ये गरोदर असलेली दीपिका पादुकोण हिने देखील हजेरी लावली होती.

कल्की 2898 AD या चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर बुधवारी 19 जूनला एक मोठा इव्हेंट पार पडला. यामध्ये गरोदर असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने देखील हजेरी लावली होती.

या इव्हेंटमध्ये आपलं बेबी बम्प फ्लॉंट करताना दीपिका अत्यंत सुंदर दिसत होती. तिचे या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये दिसत आहे की, गरोदर दीपिकाला चालताना चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि दक्षिणात्य अभिनेता प्रभास देखील मदत करत आहे.

दरम्यान नाग अश्विन यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटांमध्ये दीपिकासह प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
