Kalki 2898 AD : अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, वाचा सविस्तर

Kalki 2898 AD : अवघ्या 100 रुपयात पाहता येणार प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, वाचा सविस्तर

Kalki 2898 AD Tickets: प्रभासचा (Prabhas) ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD ) हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 1300 कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असून त्याची कमाई थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. (Box Office) या आठवड्यात ही कमाई आणखी वाढणार आहे, कारण निर्माते एक खास ऑफर घेऊन आले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकीट दरात कपात करून प्रभासच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. ‘कल्की 2898 AD’चे निर्माते एक नवीन ऑफर घेऊन आले आहेत जी एक आठवडा चालणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki 2898 – AD (@kalki2898ad)


‘कल्की 2898 एडी’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे की 2 ऑगस्टपासून कल्की एका आठवड्यासाठी फक्त 100 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. लोकांनी चित्रपटाला खूप प्रेम दिले आहे, त्या बदल्यात निर्मात्यांनी ही खास ऑफर आणली आहे.

तिकीट 100 रुपयांना विकले जाईल

सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’चे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की,’धन्यवाद हा खूप छोटा शब्द आहे. या आठवड्यात आम्ही तुमचे कौतुक करत आहोत. मेगा ब्लॉकबस्टर ‘Kalki 2898 AD’चा फक्त 100 रुपयांमध्ये आनंद घ्या. ही ऑफर 2 ऑगस्टपासून एका आठवड्यासाठी उपलब्ध आहे. निर्मात्यांची ही पोस्ट पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. ते भरपूर कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे की, कोण पुन्हा चित्रपट पाहायला जाणार? तर दुसऱ्याने लिहिले मी उद्यासाठी तयार आहे.

Prabhas: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ला पहिला पुरस्कार जाहीर; नाग अश्विनने फोटो शेअर करत दाखवली झलक

‘कल्की 2898 एडी’ बद्दल बोलायचे झाले तर प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. दिशा पटानी, विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे. आता चाहते चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘कल्की 2898 एडी’ या महिन्यात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. प्राइम व्हिडिओने चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube