दिग्गजांच्या उपस्थितीत सचिनच्या लेकाचा विवाह संपन्न! ग्रँन्ड सोहळ्याचे खास फोटो एकदा पाहाच
Sachin Tendulkar चा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण अर्जुनचा दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये ग्रँन्ड विवाहसोहळा पार पडला.
shruti letsupp
Sachin Tendulkar
भारतीय क्रिकेटचा ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ही चर्चा त्याच्या खेळाची नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल आहे.
कारण 5 मार्च 2026 रोजी अर्जुन तेंडुलकरचा दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये ग्रँन्ड विवाहसोहळा पार पडला.
अर्जुनची पत्नी सानिया चांडोक ही मुंबईतील प्रतिष्ठित घई कुटुंबातील असून, त्यांचा व्यवसाय हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्न उद्योगात पसरलेला आहे.
त्यांच्या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि लोकप्रिय ब्रुकलिन क्रीमरी (कमी कॅलरी आइस्क्रीम ब्रँड) यासारख्या व्यवसायांची मालकी आहे.
सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. ती देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे.
तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर सध्या 25 वर्षांचा असून भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या विवाह सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
यामध्ये क्रीडा, बॉलिवूड, उद्योग, तसेच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती