Photo’s : अंगावर शहारे आणणारा काळाचा घाला… जीवाच्या आकांताने ते काचांवर हात मारत होते
shruti letsupp
Samruddhi Accident Buldhana
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. त्यात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला आहे.
बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. बस डिव्हायडरला धडकून, टायर घासल्याने आणि डिझेल टँक फुटल्याने बसने पेट घेतला.
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस क्रमांक MH-29-BE-1819 ही बस नागपूरहून पुणेच्या दिशेला निघाली होती. बसमध्ये 30 प्रवासी आणि ट्रॅव्हल्सचे 3 कर्मचारी होते. यातील 26 जणांचा मृत्यू झाला तर 8 प्रवासी सुखरुप आहे.
टायर फुटून बस समृद्धी महामार्गावर एका खांबाला बस धडकली, असे बसचालक सांगत आहे. बस उलटल्याने डिझेल टँक फुटला. बसला आग लागली. प्रवाशांना बाहेर पडता आलेले नाही. प्रवाशांचा कोळसा झाला. सांगड्यावरून त्यात तीन लहान मुले आहे. प्रवाशांची ओळख पटवून ते नातेवाइकांच्या ताब्यात देणे ही मोठी अडचण निर्माण होत आहे.
भीषण अपघातानंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे.
चार दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यातील फरक सांगत आणि त्रुटींवर बोट ठेवत समृद्धीचे वाभाडे काढले होते.
आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर जवळपास विविध अपघातांमध्ये 300 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन महिन्यात 350 अपघात 500 लोकांचा बळी गेला आहे.