समुद्रयान मोहीम : समुद्राचा तळ गाठणारा ‘मत्स्य 6000’ प्रकल्प…
sagargorkhe letsup
Matsya 6000 Samudrayaan
चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज.
इस्रोने अंतराळाचा वेध घेतल्यानंतर भारत आता समुद्राचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार.
मत्स्य 6000 ही सबमर्सिबल आहे. तीन माणसांसह समुद्राच्या खाली सहा हजार मीटरपर्यंत जाऊ शकते.
चेन्नईमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी’ने (NIOT) याची निर्मिती केली आहे.
2024 साली बंगालच्या महासागरात ‘मत्स्य 6000’ची चाचणी घेण्यात येणार.
मत्स्य 6000 चा व्यास 2.1 मीटर असून 80 एमएमच्या जाड थराच्या टायटॅनियम मिश्र धातूपासून ही सबमर्सिबल बनवण्यात आली.
‘मत्स्य 6000’ सलग 12 ते 16 तास काम करू शकते. त्यात 96 तास चालेल इतका ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.