भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
सर्वात मोठ्या रॉकेट LVM3 (लाँच व्हेईकल मार्क III) ने LVM3-M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 OneWeb उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केले
श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून (launch pad) उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोची व्यावसायिक शाखा आणि NewSpace India Limited (NSIL) सोबतच्या व्यावसायिक करारांतर्गत वनवेबसाठी हे दुसरे मिशन राबविले
या लॉन्चमुळे 2023 मध्ये जागतिक कव्हरेज सक्षम करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी OneWeb चे Gen-1 (first generation) टार्गेट पूर्ण केले आहे.