राहुल गांधींची भात लावणी करत शेतकऱ्यांशी “मन की बात”, पाहा फोटो
letsupteam
Rahul Gandhi
दिल्लीहून शिमल्याला जाताना राहुल गांधींनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनीपतमधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राहुल गांधींनी गावकऱ्यांशी संवादही साधला. शेतात भात लावण्यापूर्वी जमीन तयार करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरही चालवला.
राहुल गांधी यांनी सकाळी सातच्या सुमारास मदिना आणि बडोदा गावात शेतकऱ्यांसमवेत भाताची लागवड केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी सकाळी दिल्लीहून शिमल्याला जात असताना अचानक सोनीपत येथे थांबले. येथे त्यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राहुल गांधींनी शेतात उभा असलेला ट्रॅक्टरही चालवला. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीची माहिती घेतली.
राहुल गांधी यांनी शेतांची पाहणी केली. शेतात भात लावणीची माहिती घेतली आणि स्वतः मजुरांसह भात लावणी केली.
कुंडली सीमेवर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक कार्यक्रम बदलला आणि सोनीपतच्या दिशेने वळले.
राहुल गांधी मुरथळमार्गे महामार्गावरून कुराड रोड बायपासमार्गे गोहानाकडे रवाना झाले.
एकीकडे मोदी सरकार त्यांना वेगवेगळ्या मार्गाने घेरण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी “मोहब्बत की दुकान” उघडत आहेत.
सोनीपतमध्ये राहुल गांधींची भात लावणी करत शेतकऱ्यांशी “मन की बात”