⦁ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला.
⦁ या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते.
⦁ याचे काही खास फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये पवार कुटुंबियांसह नव दाम्पत्य खास लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
⦁ हा साखरपुडा मुंबईमध्ये प्रभादेवी येथील तनिष्काच्या घरी पार पडला. यावेळी संपूर्ण पवार आणि कुलकर्णी परिवार उपस्थित होता.