cannes festival मध्ये सनी लिओनीचा स्टनिंग लूक, चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
shruti letsupp
Sunny Leon
76 व्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (cannes festival) अनेक भारतीय अभिनेत्रीनी सहभाग नोंदवला आहे. 16 मे पासून सुरू झालेला हा फेस्टीव्हल 27 मे पर्यंत चालणार आहे.
आत्तापर्यंत कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर इंडियन अभिनेत्रीसह जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने यंदा कान्समध्ये पदार्पण करत आपले सौंदर्य दाखवून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
तिने नुकतेच तिचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सनीने डिझायनर मारिया कोखियाने डिझाईन केलेला वन साईड शोल्डर ग्रीन गाऊन घातला आहे. या ड्रेसवर सनीने मोकळे केस, कानांत छोटे टॉप्स आणि लाइट मेकअप केला आहे. तसेच मॅचिंग हील सनीच्या लूकला स्टायलिश केले आहे.
दुसऱ्या लूकमध्ये तिने ब्लॅक फ्रील क्रॉप टॉपवर व्हाईट पॅंट घालणे निवडले आहे. या लूकमध्ये सनीने केस स्ट्रेट ठेवले आहेत. तर मेकअपही सेटल ठेवला आहे.
सनीच्या या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.