Download App

दारूच्या नशेत ‘हे’ खेळाडू एकमेकांशी भिडले

  • Written By: Last Updated:
1 / 7

क्रिकेटच्या खेळातही अनेक वेळा मैदानाबाहेर खेळाडूंनी केलेल्या कृत्यांमुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना संघातूनही वगळण्यात आले आहे.

2 / 7

कोणत्याही खेळात असे काही खेळाडू असतात, मग ते त्यांच्या खेळासोबतच इतर कारणांमुळेही प्रसिद्धीच्या झोतात येतात. क्रिकेट जगतातही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत जेव्हा एखाद्या खेळाडूला मैदानाबाहेर केलेल्या कृत्यांमुळे टीकेबरोबरच अपमानालाही सामोरे जावे लागते.

3 / 7

ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्सची कारकीर्दही दारूमुळे संपुष्टात आली. 2009 मध्ये, जेव्हा सायमंड्सवर दारूच्या नशेत मैदानात उतरल्याचा आरोप झाला तेव्हा त्याला लगेचच संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर या खेळाडूचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले नाही.

4 / 7

न्यूझीलंड संघाचा माजी सलामीवीर जेसी रायडर याची स्फोटक सलामीवीरांमध्ये गणना होते. जेसीला पार्टी करण्याची खूप आवड होती आणि एकदा क्राइस्टचर्चमधील नाईट क्लबमध्ये पार्टी सुरू असताना, त्याच्यावर जमावाने हल्ला केला होता ज्यात तो गंभीर जखमी झाला होता आणि यामुळे तो पुन्हा मैदानात परत येऊ शकला नाही.

5 / 7

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॉन्टी पानेसरने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणले आहे, परंतु 2013 साली घडलेल्या एका घटनेमुळे त्याची संपूर्ण कारकीर्द संपुष्टात आली. मोंटीने मद्यधुंद अवस्थेत क्लबच्या बाउन्सरवर लघवी केली आणि त्यानंतर त्याला इंग्लंड संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

6 / 7

डेव्हिड वॉर्नरची गणना क्रिकेटचा बॅड बॉय खेळाडू म्हणूनही केली जाते. 2013 मध्ये वॉर्नरने इंग्लंडचा खेळाडू जो रूटला दारूच्या नशेत पबमध्ये धक्काबुक्की केली. यामुळे त्याला संघातूनही वगळण्यात आले होते. त्यानंतर जवळपास 2 वर्षे वॉर्नरने दारूला हातही लावला नाही.

7 / 7

जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 1999 मध्ये एका नाईट क्लबमध्ये एका पार्टीदरम्यान खूप दारू प्यायली होती. यानंतर एका अनोळखी व्यक्तीसोबत झालेल्या भांडणामुळे त्याला ऑस्ट्रेलियन वनडे संघातूनही काही काळ वगळण्यात आले होते.

Tags

follow us