Download App

Uttarkashi tunnel collapse : कधी श्वास थांबला, कधी दिलासा मिळाला; पाहा मजुरांच्या रेस्क्यूचा घटनाक्रम…

  • Written By: Last Updated:
1 / 9

Uttarkashi tunnel collapse : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर मंगळवारी सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.

2 / 9

- या 17 दिवस चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक चढ-उतार आले. त्यामुळे हे मजूर कधी बाहेर पडणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यात जेव्हा रेस्क्यूमध्ये अडचणी आल्या तेव्हा श्वास थांबला तर कधी दिलासा मिळत होता.

3 / 9

दरम्यान या 8 राज्यांतील 41 मजूरांचे नातेवाईक या टनलच्या बाहेर तळ ठोकून होते. ते आपल्या कुटुंबीयांसाठी या मजूरांसाठी प्रार्थना करत होते.

4 / 9

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये विविध अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्यात मजूरांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तसेच मजूर बाहेर येताच त्यांच्यासाठी मेडिकल सुविधा देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यात या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काय-काय टर्निंग पॉईंट आले याबद्दल जाणून घेऊ...

5 / 9

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये विविध अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात आला. त्यात मजूरांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तसेच मजूर बाहेर येताच त्यांच्यासाठी मेडिकल सुविधा देखील सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यात या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काय-काय टर्निंग पॉईंट आले याबद्दल जाणून घेऊ...

6 / 9

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यासाठी 12 नोव्हेंबरला रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. त्यात यश आलं नाही. त्यामुळे अमेरिकेहून ऑगर मशीन्स मागवण्यात आल्या.

7 / 9

या दरम्यान मजुरांना पाईपच्या माध्यमातून अन्न पाणी देण्यात आलं. वॉकी टॉकीद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यात टनलमध्ये पाणी ऑक्सिजन आणि प्रकाश असल्याचे समजले.

8 / 9

अमेरिकेहून मागवलेल्या ऑगर मशीनने खोदकाम सुरू करण्यात आलं. मात्र ते मजूरांपासून 10 मीटरच्या अंतरावरच खराब झालं. त्यामुळे रेस्क्यू ठप्प झालं. या मशीनला पर्याय म्हणून सैन्याच्या जवानांनी मैन्युअली ड्रिलिंग केलं.

9 / 9

मात्र या रॅट होल मायनिंगवर सरकारने बंदी घातलेली आहे. कारण भारतात जशी वीज चोरी होती तशीच खनिजांचीही चोरी होते. मेघालयात कोळसा, लोहखनिज, चुनखडी आणि डोलोमाइटचे प्रचंड साठे आहेत. ही खनिजे काढण्यासाठी स्थानिक लोक एकत्र येतात आणि उदरनिर्वाहासाठी खनिजांची चोरी करतात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीला रॅट-होल मायनिंग म्हणतात.

Tags

follow us

वेब स्टोरीज