Valentine Day : रूबीचा नेकलेस ते बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट, बॉलिवूड स्टार्सचे महागडे व्हॅलेंटाईन गिफ्ट्स
shruti letsupp
Valentine Day
Valentine Day
यामध्ये अभिनेता ऋतिक रोशनने त्याची पहिली पत्नी सुजैन खान हिला महागड्या ‘हिऱ्यांची अंगठी’ गिफ्ट केली होती.
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला पती विराट कोहलीकडून व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘रुबीचा नेकलेस’ मिळाला होता.
बॉलीवूड सह हॉलीवुड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राला पती निक जोनसकडून ‘टिफनी अँड कंपनी’ या महागड्या ब्रँडचा नेकलेस सेट देण्यात आला होता.
अभिनेता अजय देवगनने पत्नी काजोलला एक ‘जर्मन लक्झरी ऑडी सेडान’ गाडी गिफ्ट म्हणून दिली होती.
बॉलीवूडमधील सध्याचे रोमांटिक कपल म्हणजे रणबीर-आलिया रणबीरने आलियाला व्हॅलेंटाईन डे निमित्त एक महागडं ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं.
तसेच अभिनयाबरोबर फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीला तिचा पती राज कुंद्रा यांनी थेट ‘बुर्ज खलिफा’ या दुबईतील प्रसिद्ध इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर असलेला एक फ्लॅट गिफ्ट केला होता.
अभिनेता सैफ अली खानने पत्नी करीना कपूरला व्हॅलेंटाईन डे निमित्त एक लक्झरी सॉलिटेयर डायमंड रिंग दिली होती.