गेल्या वर्षी ज्येष्ठ उर्दू लेखक आणि शायर गुलजार यांना साहित्यातील मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
त्यानंतर यंदा 22 मे ला त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 22 मे रोजी दुपारी ज्ञानपीठचे ट्रस्टी आणि त्यांचे सहकारी गुलजारांच्या घरी आले.
त्यावेळी लेखक अरूण शेवते हे देखील या क्षणाचे साक्षीदार झाले. याबद्दल त्यांनी पोस्ट करत आपल्या भावना आणि काही खास फोटो शेअर केले आहेत.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अरूण शेवते म्हणाले की, ‘नेहमी प्रमाणे सहज मी गुलजार साहेबांना फोन केला. बऱ्याच दिवसात भेट नव्हती. त्यांच्याशी फोन झाल्यावर ते म्हणाले,’ मी तुलाच फोन करणार होतो. दिल्लीची माणसे येणार आहेत घरी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यासाठी. तू घरी ये आणि अंबरीशला ही घेऊन ये.’
मी ही त्याच दिवसाची वाट पाहत होतो. गुलजार साहेबांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकले नाही.22 मे ला दुपारी ज्ञानपीठचे ट्रस्टी आणि त्यांचे सहकारी साहेबांच्या घरी आले.
मी, अंबरीश मिश्र, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, साहेबांचे जावई गोविंद सिंधू, पवन झा, कवी विश्वनाथ सचदेव, अशोक बिंदल अशी मोजकीच माणसे उपस्थित होती.
गुलजार साहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार घेताना मला साक्षी होता आले याचा आनंद कायम स्मरणात राहील.