Download App

आतुरभक्तांसाठी दर्शन सुरू; मंदिर संवर्धनानंतरचे विठुराया अन् रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याचे खास फोटो…

Vitthal Rukhmini विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते.

1 / 6

विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते.

2 / 6

ते दर्शन आज पासून सुरू केले असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली

3 / 6

देवाचा गाभारा ,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना केशरी झेंडु , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडू ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली

4 / 6

ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त दत्ता निकाळजे यानी केली असुन यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे

5 / 6

विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे तर विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे

6 / 6

आज पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहाअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व सदस्य, वारकरी प्रतिनिधी, यांच्या उपस्थितीत विठुरायाची महापूजा संपन्न झाली.

follow us

संबंधित बातम्या