Download App

थाटामाटात पार पडला वरूण तेजचा साखरपुडा; पाहा कोण आहे? चिरंजीवीची नवी सून…

1 / 5

वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तसेत तो चिरंजीवी आणि पवन कल्याणचा पुतण्या आहे. वरूण तेजचा नुकताच गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी हीच्यासोबत साखरपुडा पार पडला. या थाटामाटात पार पडलेल्या साखरपुड्यातील काही रोमॅंटीक फोटो वरूण आणि लावण्या या दोघांनी देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

2 / 5

त्यामुळे आता वरूण तेजची होणारी पत्नी आणि चिरंजीवीची नवी सून लावण्या त्रिपाठी नेमकी कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. जाणून घेऊ कोण आहे? लावण्या त्रिपाठी...

3 / 5

लावण्या त्रिपाठी उत्तप प्रदेशची असून तिने उत्तराखंडातील देहरादूनमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे. तर पदवीच शिक्षण तिने मुंबईतील ऋषी दयाराम नॅशनल महाविद्यालयात पूर्ण केले आहे. त्यावेळीच तिला अभिनयाची गोडी लागली. तिने मॉडेलिंग करायला सुरूवात केली.

4 / 5

त्यानंतर काही जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने मालिकाविश्वात काम केलं. त्यानंतर तिने 'अंडला राक्षसी नाम' या चित्रपटातून तिने दाक्षिणात्या चित्रपटासृष्टीत पदार्पण केलं. तिच्या नावावर 2006 सालचा 'मिस उत्तराखंड'चा किताबही आहे.

5 / 5

तर या वर्षी तिने 'पुली मेका' या सिरीजच्या माध्यामातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. तर आता ती दाक्षिणात्य अभिनेता आणि चिरंजीवीचा मुलगा वरूण तेजशी विवाहबद्ध होणार आहे.

Tags

follow us