अभिनेत्री सुष्मिता सेनच्या ‘ताली’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात एका व्यक्तीचा गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ‘ताली’ या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. जाणून घेऊ गौरी सावंतची गोष्ट
2 / 8
श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर असून एक समाजसेविका आहेत. त्यांच्या समाजाला देशीत ओळख मिळावी यासाठी त्या काम करतात.
3 / 8
पण त्या गौरी सावंत कशा झाल्या? त्या अगोदर कोण होत्या? अनेकांना माहिती नाही. तर गौरी सावंत यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबामध्ये झाला.
4 / 8
त्यांचं खरं नाव गणेशनंदन असं होतं. मात्र त्यांना आपल्यातील बदल जाणवल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. गणेशचं बोलणं एकूण त्यांचे घरचे संतापले.
5 / 8
वयाच्या 15-16 व्या वर्षीचं त्यांना घराच्या बाहेर काढून देण्यात आलं. एवढंच नाही त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील केले.
6 / 8
त्यानंतर त्या हमसफर ट्रस्टमध्ये आल्या तेथे त्यांनी गणेश सावंत हे नाव बदलून गौरी सावंत केलं. स्वतः ओळख निर्माण करत त्यांनी एक मुलगीही दत्तक घेतली.
7 / 8
त्यांच्या या मुलचं नाव गायत्री असून ती आज 24 वर्षांची आहे. तसेच गौरी यांचं समाज कार्य आजही अविरथ सुरू आहे.
8 / 8
ताली या वेब सीरिमध्ये सुष्मिता ही गौरी यांच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळणार आहे.