Download App

मोठी बातमी! गाझातील मशीदी अन् शाळांवर इस्रायलचा हवाई हल्ला, 24 जण ठार

Israel-Iran War: इराण आणि इस्राइलमध्ये (Israel) सुरु असलेल्या युद्धात आता इस्राइलकडून गाझा आणि लेबनॉनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात येत

  • Written By: Last Updated:

Israel-Iran War: इराण आणि इस्राइलमध्ये (Israel) सुरु असलेल्या युद्धात आता इस्राइलकडून गाझा आणि लेबनॉनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करण्यात येत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार इस्राइलने पुन्हा एकदा गाझाला टार्गेट केला आहे.

इस्राइलकडून गाझातील मशीदीवर आणि शाळांवर हवाई हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर 93  जण जखमी झाले आहे. माहितीनुसार, रविवारी इस्राइलकडून गाझा पट्टीतील विस्थापितांना आश्रय देणारी मशीद आणि शाळेवर टार्गेट करण्यात आले आहे. ज्यामध्ये तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे तर 93 जण जखमी झाले आहे.

तर इस्राइलने दावा केला आहे की त्यांनी इब्न रुश्द स्कूल आणि देर अल-बालाह येथील शुहादा अल-अक्सा मशिदीमध्ये असणाऱ्या हमास दहशतवाद्यांवर टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे इस्राइलने शनिवारी रात्री लेबनॉनमधील बेरूतवरही हल्ला केला होता.

इस्त्रायली संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, आतापर्यंत चालू असलेल्या जमिनीवरील कारवाईत 400 हून अधिक हिजबुल्लाह दहशतवादी मारले गेले आहेत. माहितीनुसार, इस्रायली सैन्याने लोकांना बेरूतच्या दक्षिणेकडील दहियाह शहर रिकामे करण्यास सांगितले होते. यानंतर इस्रायलने मध्यरात्री येथे बॉम्बफेक केली.

‘माझ्यासमोर येऊन बोला, तंगड्या तोडून हातात देईल’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर शा‍ब्दिक हल्ला

इस्राइलच्या या कारवाईत अनेक दहशतवादी आणि हमासचा अधिकारी सईद अताल्लाह अली आणि त्याचे कुटुंब ठार झाल्याचा दावा इस्राइलकडून करण्यात आला आहे. तर हमासने दावा केला आहे की, इस्राइलच्या हल्ल्यात हमासचा एक सदस्य मारला गेला असल्याचा दावा केला आहे.

“ज्या आमच्या जागा, त्या आम्ही शंभर टक्के लढणारच”, राऊतांनी क्लिअरच केलं

follow us