“ज्या आमच्या जागा, त्या आम्ही शंभर टक्के लढणारच”, राऊतांनी क्लिअरच केलं

“ज्या आमच्या जागा, त्या आम्ही शंभर टक्के लढणारच”, राऊतांनी क्लिअरच केलं

Sanjay Raut on Seat Sharing : ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढणारच आहोत. एखादं दुसरी जागा इकडे तिकडे होवू शकते ते आम्ही चर्चा करुन ठरवू, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना जागावाटपात हक्काच्या जागा सोडणार नसल्याचे सूचक शब्दांत सांगितले. शरद पवार यांचे अनेक नेते सोडून गेले तरी देखील नेते शरद पवार यांनाच मानतात तसेच शिवसेनेचे नेते सोडून गेले असले तरी जनतेचे मत शिवसेनेलाच मिळणार संजय राऊत म्हणाले.

अडीच वर्षांमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके आणि पाकीट संस्कृती वाढली आहे. आमदार, खासदार, पदधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी आपल्या राज्यात आली नव्हती. नरेंद्र मोदींनी या देशातील मिडीया चॅनल विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली. संपूर्ण मीडिया म्हणेज पूर्ण कंपन्या विकत घ्यायच्या आणि मग खालची लोकं त्यालाच अनुसरुन पत्रकारांना, जिल्हा प्रतिनिधींना, संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. राज्यातला पत्रकार या पाकीटाखाली दबला जाणार नाही याची मला खात्री आहे, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचंय

उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्त्व करावं या भुमिकेत आम्ही आहोत आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी करुन बेईमानांच्या हातात सूत्रं दिली त्या उद्धव ठाकरेंसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्रिपदापासून दूर केलं हा आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे. तो आम्हाला भरुन काढायचा असेल तर आम्हाला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. आम्ही व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिसेनेकडे कधीही त्यादृष्टीने पाहत नाही. बाळासाहेबांनी ठाकरेंनी आम्हाला जे काही दिलयं ते खूप आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिलं होत; शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube