26 apps ban in Nepal youngters protest 14 dead : नेपाळमध्ये सोशल मिडीयासह 26 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता तरूणाई या विरूद्ध थेट संसदेत घुसली आहे. या आंदोलनामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या नेपाळमध्ये हजारोंच्या संख्येने तरूणाई जी जेन-झी म्हणून ओळखली जाते ती रस्त्यावर उतरली आहे. राजधानी काठमांडू मध्ये हे जोरदार निदर्शन, संसदेत तरूणाई घुसली आहे. पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. त्यात लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेपाल सरकारने आपतकालीन बैठक बोलावली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत काठमांडू शहरात कर्फ्यु लावण्यात आला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने काठमांडूमध्ये सैन्याला पाचारण करण्यात आले आहे.
“लक्ष्मण हाकेंचे ते संस्कारच… तर रोहित पवारांना पोटदुखी झालीये…”, परांजपेंनी घेतलं फैलावर
या प्रकरणाची सुरूवात झाली ती नेपाळ सरकाने 2024 मध्ये सोशल मिडीया अॅप्सबाबत एक कायदा केला होता. त्यानुसार सर्व कंपन्यांना नेपाळमध्ये ऑपरेशन्ससाठी एक स्थानिक कार्यालय बनवावे लागतील. त्यांना तेथे करदाते म्हणून नोंदणी करावी लागेल. हे नियम न पाळणाऱ्या अॅप्सवर कारवाई केली जाईल असं देखील या कायद्यामध्ये म्हटलं होतं. त्यानुसार 3 सप्टेंबर ला या कायद्यानुसार नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्युबसह 26 सोशल मिडीया अॅप्सवर बंदी घातली आहे. या सर्व प्लॅटफॉर्म्सने नेपाळ दूरसंचार आणि सूचना प्राद्योगिक मंत्रालयमध्ये नोंदणी केली नव्हती. मंत्रालयाने 28 ऑगस्टपासून 7 दिवसांचा वेळ दिला होता.