मोठी बातमी! रशियाचा युक्रेनमध्ये भीषण ड्रोन हल्ला; गोदामात स्फोट, 37 जणांचा मृत्यू, 42 जण जखमी

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या गोदामात दारुगोळा आणि स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती.

News Photo   2026 08 29T204210.650

मोठी बातमी! रशियाचा युक्रेनमध्ये भीषण ड्रोन हल्ला; गोदामात स्फोट, 37 जणांचा मृत्यू, 42 जण जखमी

रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षांहून (War) अधिक काळ लोटला असून संघर्षाची तीव्रता अद्याप कायम आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या कीव प्रांतातील बुचा जिल्ह्यातील मायला येथील एका गोदामावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर गोदामात भीषण स्फोट झाले असून किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. कीव प्रांताचे गव्हर्नर तिमुर तकाचेंको यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या गोदामात दारुगोळा आणि स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती. ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे परिसरात मोठी आग लागली. ही आग काही निवासी घरांसह एका रेस्टॉरंटपर्यंत पोहोचली. या घटनेत किमान 50 निवासी इमारतींचे नुकसान झाले असून मृतांमध्ये दिमित्रिव्हस्काचे महापौर तारास डिडिच यांचाही समावेश असल्याचे प्रशासनाने सांगितलं.

नेपाळमध्ये पुराच्या पाण्यात वाहून आलेली बँकेची तिजोरी लुटली, आतापर्यंत 29 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

या हल्ल्यात 42 जण जखमी झाले असून बचाव पथकांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, हल्लाग्रस्त परिसरातील 380 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्फोटक सामग्रीच्या साठवणुकीमुळे झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता युक्रेनच्या प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही मायला येथील गोदामावरील हल्ल्याची पुष्टी केली आहे. निवासी भागाजवळ दारुगोळा साठवण्यास स्पष्टपणे मनाई असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित गोदामात स्फोटक सामग्री ठेवण्याची परवानगी होती का, तसेच कंपनीकडे आवश्यक परवाने आणि मंजुरी होती का, याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचं झेलेन्स्की यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version