रशियाचा युक्रेनवर घातक हल्ला, 597 ड्रोन आणि 26 मिसाइल्स डागल्या; झेलेन्स्कींचं रशियावर निर्बंध लादण्याचं आवाहन

Russia Ukraine War : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धामध्ये पुन्हा एकदा मोठा घातकी हल्ला केला गेला आहे. हा हल्ला रशियाने युक्रेनवर केला आहे. या युद्धातील हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. (War) याबाबत स्वत: युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी जगाला रशियावर कडक निर्बंध लादले जावेत असं आवाहन देखील केलं आहे.
शुक्रवारी रात्री यूक्रेनवर 597 ड्रोन आणि 26 मिसाइल्स डागण्यात आल्या. या युद्धातील हा सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. यामध्ये जास्तीत जास्त शाहेद ड्रोन होते. जे इराणमध्ये बनलेले आहेत. यापैकी युक्रेनने 319 ड्रोन आणि 25 मिसाइल्स नष्ट केल्या. मात्र जावळपास 20 ड्रोन आणि एक मिसाइल पाच ठिकाणी पडली . त्यामुळे नुकसान झालं.
रशिया अन् युक्रेन युद्धाची धग कायम; रशियातील नेते रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह आढळला
याबाबत स्वत: युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी जगाला रशियावर कडक निर्बंध लादले जावेत असं आवाहन देखील केलं आहे. त्यामध्ये विशेषत: या प्रकरणी त्या देशांना शिक्षा आणि करण्यची मागणी केली जे रशियाला मदत करत आहेत.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी रशिया सतत शांततेच्या प्रयत्नांना नाकारत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली.
हा हल्ला खूप काही सांगून जाणारा आहे , अनेक देशांनी युद्धविराम व शांततेसाठी प्रयत्न केले, परंतु रशिया त्याला सातत्याने नकार देत आहे. आमचे आंतरराष्ट्रीय भागीदार जाणून आहेत की रशियावर दबाव टाकण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी लागेल, ज्यामुळे ते युद्ध थांबवण्याचा विचार करतील, नव्हे तर नवीन हल्ले सुरू ठेवणार नाहीत, असंही झेलेन्स्की म्हणाले.