रशिया अन् युक्रेन युद्धाची धग कायम; रशियातील नेते रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह आढळला

Russia and Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. (Russia) संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांकडं लागले आहे. अशातच आता रशियातील महत्वाचे नेते रोमन स्टारोवोइट यांचा मृतदेह आढळला असल्याची बातमी समोर आली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून काढले होते, त्यानंतर अवघ्या 3 तासांनंतर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
रोमन स्टारोवोइट हे रशियन सरकारमधील वाहतूक विभागाचे प्रमुख होते. स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. रशियन स्थानिक माध्यमांनी स्टारोवोइट यांचा मृतदेह सोमवारी त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकल्यानंतर 3 तासांनी त्यांच्या घरात आढळला असल्याचे सांगितले आहे. तसेच स्टारोवोइट यांनी आत्महत्या केली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार
टेलिग्राम 112 ने दिलेल्या माहितीनुसार, स्टारोवोइट यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक सापडली आहे. त्यानंतर रशियाच्या आपत्कालीन सेवांमधील एका सूत्राने स्टारोवोइट यांच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. मात्र ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. व्लादिमीर पुतीन यांनी स्टारोवोइट यांना एक वर्षापूर्वी वाहतूक मंत्री बनवले होते. त्यांना आधी उपपरिवहन मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आणि नंतर ते वाहतूक मंत्री बनले होते. मात्र परंतु कामातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.
आंद्रेई निकितिन हे रशियाचे नवे वाहतूक मंत्री बनले आहेत. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर अवघ्या 3 तासांत त्यांचा मृतदेह आढळला आहे. रोमन स्टारोव्होइट हे रस्ते बांधणीत हुशार होते, त्यांनी रशियामध्ये रस्त्यांचे जाळे बांधले होते. ते 2012 ते 2018 पर्यंत फेडरल रोड एजन्सीचे प्रभारी होते. त्यानंतर ते कुर्स्क प्रदेशाचे राज्यपाल देखील बनले होते. स्टारोव्होइट राज्यपाल असताना युक्रेनने रशियातील कुर्स्क ताब्यात घेतले होते, त्यामुळे पुतीन नाराज झाले होते अशी माहिती समोर आली आहे.