युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार

Russia’s strong response to Ukraine’s drone attack; 1,430 Ukrainian soldiers killed in 24 hours : जगामध्ये सुरू असलेल्या रशिया-युक्रेनच्या युद्धात रविवारी युक्रेनने केलेल्या हल्ल्याने जग खरोखरचं तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच कारण म्हणजे रविवारी 1 जून रोजी युक्रेनने रशियावर सर्वात मोठा हल्ला केल्याची. युक्रेनने 117 ड्रोनचा वापर करून रशियाच्या पाच हवाई अड्ड्यांवर हल्ला केलाय. त्यात रशियाच्या 41 लढाई विमाने उद्धवस्त झाले. या हल्ल्याला आता रशियाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या रशियाने 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार केले आहेत.

रशियाचे जोरदार प्रत्युत्तर…

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युक्रेनला प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यात युक्रेनच्या 1430 सैनिकांसह चार टॅंक, 16 बख्तरबंद लढाऊ वाहनं आणि चार तोफा गमावल्या असल्याचा दावा रशियन सुरक्षा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये करण्यात आला आहे.

त्या लाडक्या, कानउघडणी नाहीच; आयोगाच्या बैठकीनंतर गोऱ्हेंकडून चाकणकरांची पाठराखण

दरम्यान दुसरीकडे या प्रत्युत्तरामध्ये युक्रेन सैन्याकडून देखील रशियाचे 1100 सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. युक्रेनने सांगितलेल्या आकडेवारीमध्ये तर युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांत रशियाने जवळजवळ दहा लाख सैनिक गमावले आहेत. तर दुसरीकडे हल्ल्या प्रतिहल्ल्या दरम्यान रशिया- युक्रेनमध्ये युद्धबंदीसाठी शांतता बैठक देखील पार पडली.

8 तासांत पाकिस्तानने गुडघे टेकले, आपली ड्रोन यंत्रणा मजबूत; अनिल चौहान यांनी सांगितली ‘ती’ कहाणी

तुर्कीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी कैद्यांच्या आदलाबदलीच्या करारावर सहमती दर्शवली. तर युद्धात मारल्या गेलेल्या 600 सैनिकांचे अवषेश सोडले. या दोन जोरदार हल्ल्या प्रतिहल्ल्या दरम्यान इस्तांबूलमध्ये ही चर्चा पार पडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube