त्या लाडक्या, कानउघडणी नाहीच; आयोगाच्या बैठकीनंतर गोऱ्हेंकडून चाकणकरांची पाठराखण

त्या लाडक्या, कानउघडणी नाहीच; आयोगाच्या बैठकीनंतर गोऱ्हेंकडून चाकणकरांची पाठराखण

Nilam Gorhe supports Rupali Chakankar after the Women commission meeting : गेल्या काही दिवसांत राज्यात महिला आयोगाच्या कामकाजवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. त्यानंतर आज विधान भवनात उपसभापती निलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची बैठक पार पडली. यामध्ये महिला आयोगाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीनंतर रूपाली चाकणकर याचं अध्यक्षपद जाणार का? त्यांची कान उघडणी केली जाणार. अशी चर्चा करण्यात येत होती. मात्र या बैठकीनंतर गोऱ्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रूपाली चाकणकरांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

8 तासांत पाकिस्तानने गुडघे टेकले, आपली ड्रोन यंत्रणा मजबूत; अनिल चौहान यांनी सांगितली ‘ती’ कहाणी

दरम्यान या बैठकीनंतर बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या की, महिला आयोगातील रिक्त पद लवकरच भरली जाणार आहेत. तसेच बीडमध्ये गर्भपिशवी काढल्याचा धक्कादायक प्रकार घडल त्यावर उसतोड कामगार महिलांसाठी मुकादमांकडून रजा आणि सोईसुविधा करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. मात्र याचं राजकीय भांडवल केलं जात आहे. हिला आयोगातील ऋटी भरून काढण्यात येणार. तर रूपाली चाकणकरांवर आरोप करणारे लोक अज्ञानी आहेत. असं गोऱ्हेम म्हणाल्या आहेत.

…तुम्ही काय अभिनेत्री रश्मिका मंदाना आहात का?… सुषमा अंधारे यांचा रुपाली चाकणकरांवर प्रहार

तसेच तसेच बैठकीनंतर रूपाली चाकणकर याचं अध्यक्षपद जाणार का? त्यांची कान उघडणी केली जाणार. अशी चर्चा करण्यात येत होती. यावर बोलताना यावेळी निलम गोऱ्हे यांनी रूपाली चाकणकरांची या बैठकीमध्ये कोणतीही कानउघडणी झाली नाही. त्या आमच्या लाडक्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. असं म्हणत एक प्रकारे चाकणकरांची पाठराखणचं केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube