Russia Ukraine War : बायडन ते डोनाल्ड ट्रम्प.. युक्रेनला मित्रांनीच दिला दगा

Russia Ukraine War : बायडन ते डोनाल्ड ट्रम्प.. युक्रेनला मित्रांनीच दिला दगा

3 Years Of Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांनंतर आता स्पष्ट होत आहे की अमेरिकेने आधी युक्रेनला (Russia Ukraine War) युद्धाच्या आगीत ढकलले आणि आता युक्रेनची खनिज संपत्ती आणि अर्थव्यवस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लॅक रॉक, जॉर्ज सोरोसच्या कंपन्या, हॅलिबर्टन आणि अन्य अमेरिकन कंपन्या यूक्रेनमधील तेल, गॅस आणि दुर्लभ खनिज संपत्ती ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. ट्रम्प आणि त्याआधीचे बायडन प्रशासन दोघांनीही युक्रेनची प्रचंड (Ukraine War) आर्थिक लूट केली आणि हा प्रकार अजूनही सुरू आहे.

रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्षे झाली (Ukraine War) आहेत. आता या संघर्षा मागचे सत्य अधिक स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने आधी युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलले नंतर भडकावून रशियाच्या विरोधात उभे केले आणि आता युक्रेन पूर्ण उद्ध्वस्त झाला असताना देशातील साधन संपत्ती लुटण्याच्या प्रयत्नात आहे. अमेरिकेत बायडन सरकार असो किंवा आताचे ट्रम्प सरकार (Donald Trump) युक्रेनमधील बहुमूल्य साधनसंपत्ती आणि देशाची अर्थव्यवस्था ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

युक्रेन युद्ध फक्त युद्ध राहिलेले नाही तर अमेरिकी कंपन्यांसाठी लुटीचे मैदान बनले आहे. वॉल स्ट्रीटच्या मोठ्या कंपन्या आणि फायनान्स क्षेत्रातील दिग्गज युक्रेनकडे एक व्यवसायाची संधी म्हणून पाहत आहेत.

अमेरिकेनंतर आता भारतीयांना कॅनडातूनही बाहेर पडावे लागणार; स्टडी व वर्क परमीटबाबत घेतला मोठा निर्णय

अमेरिकी कंपन्यांची गुंतवणूक

जगातील मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक असलेली ब्लॅकरॉकने सन 2023 मध्ये युक्रेन सरकारबरोबर रणनीतीक गुंतवणूक आणि पुनर्निर्माण करार केला. या कराराचे सत्य म्हणजे कंपनीला युक्रेनच्या खनिज संपत्ती, ऊर्जा स्रोत आणि प्रमुख उद्योगांत गुंतवणुकीचा विशेष अधिकार मिळाला.

या लुटीत जॉर्ज सोरोसच्या कंपन्या सुद्धा मागे राहिल्या नाहीत. सोरोसची संस्था ओपन सोसायटी फाउंडेशन दीर्घ काळापासून युक्रेनमध्ये सक्रिय आहे. आता त्यांचे गट आर्थिक पुनर्निर्माणाच्या नावाखाली युक्रेनमधील उद्योगांवर कब्जा करण्याचा प्लॅन तयार करत आहेत. याव्यतिरिक्त अन्य अमेरिकन कंपन्यांनी युक्रेनच्या तेल आणि गॅस क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. युद्धाच्या नावाखाली येथे आपली पकड अधिक मजबूत केली आहे.

खनिज संपत्तीवर डोळा

युक्रेनमध्ये लिथियम, टायटेनियम, निकेल आणि अन्य खनिजांचे मोठे साठे आहेत. यांचा उपयोग अत्याधुनिक हत्यारे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजीत केला जातो. पश्चिमी देशांत विशेष करून अमेरिकेसाठी हे खनिज सोन्यापेक्षाही कमी नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात दुर्लभ संसाधनांच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे.

पनामा अन् कोस्टा रिका! भारतीयांना दुसऱ्या देशांत का धाडतोय अमेरिका? ट्रम्पचा प्लॅन नक्की काय?

ट्रम्प यांना वाटते की अमेरिकी कंपन्यांना किमान पाचशे अब्ज डॉलर्स किमतीच्या संसाधनावर थेट नियंत्रण मिळावे. पण झेलेन्स्की यांनी आधीच काही करार युरोपियन युनियनबरोबर केले आहेत. अशा परिस्थितीत जर झेलेन्स्की यांनी जर ट्रम्प यांच्या अटी मान्य केल्या नाहीत तर युक्रेनवर अधिक दबाव टाकू अशी धमकी कंपन्यांनी दिली आहे. इतकेच नाही तर स्टारलिंक इंटरनेट सेवा बंद करणे आणि सैन्य मदत रोखण्याच्या धमक्या दिल्या.

बायडन प्रशासनही आघाडीवर

जर कुणाला असे वाटत असेल की ही फक्त डोनाल्ड ट्रम्प यांचीच रणनीती आहे तर असे नाही. बायडन प्रशासनच्या काळातही अमेरिकन कंपन्यांनी युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॅकरॉक कंपनीशी झालेला करार बायडन प्रशासनच्या काळात स्वीकृतीने घेतला आहे. जॉर्ज सोरोस आणि बाकीच्या कंपन्यांनी बायडन यांच्या कार्यकाळात युक्रेन सरकारची संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube