Ashadhi Wari 2025 : योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करणार? मंडळाचे विश्वस्त भावार्थ देखणे यांनी दिलं उत्तर

Bhavarth Dekhane On Alandi Devasthan Trustees Misbehave With Warkaris : पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात (Pune) घडलेल्या एक वादग्रस्त घटना घडली. त्यामुळे सध्या वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर आहे. आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांनी (Alandi Devasthan Trustees Misbehave) वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी उद्धट वर्तन केले, असे आरोप आहेत. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात (Ashadhi Wari 2025) हा प्रकार घडल्याचं समोर येतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, निरंजन नाथ मंदिरात असताना काही वारकरी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी उर्मटपणे वक्तव्य केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पोलिसांशी देखील अरेरावीची भाषा वापरली. यावर आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी (Bhavarth Dekhane) प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही दिलगीरी व्यक्त करतो…
भावार्थ देखणे यांनी म्हटलंय की, जो काही प्रकार घडला, त्यासाठी मी विश्वस्त मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत आहेत. मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे. आमचा आधारवंत हा धर्म आहे, आम्ही शिकलेले असतो. पण जर कोणी मुजोरी करत असेल तर आम्ही त्याला त्या-त्या वेळी समज देत असतो आणि देणार पण आहोत. काल जो काही प्रकार घडला, त्यानंतर आम्ही त्वरित बैठक घेतली. त्यानंतर दिलगिरी वक्त करण्यासाठी आम्ही आता ही एक बैठक घेणार आहोत. त्या मिटींगमध्ये आम्ही कशा पद्धतीने मिडीयातले बांधव माऊलीचं वैभव जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुमच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.
ब्रेकिंग! काम मिळेना… मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने संपवलं जीवन, सिनेसृष्टीत शोककळा
कुठलीही गोष्ट जेव्हा मीडियासमोर असते, तेव्हा मिडिया आम्हाला जगापर्यंत पोहोचवत आहे. जेव्हा मुलाखतीसाठी कोणी आलं, तेव्हा कोणाची मुलाखत कुठे घेत आहोत, व्यवस्थेचे काही प्रोटोकॉल असतात, त्यांचं पालन करावं लागतं. हे करत असताना तेथे प्रशासन आहे, त्यात कोणतीही अडकाठी करायला नको. कालच्या प्रकारावर विश्वस्त नात्याने माफी मागतो.
यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास ! केदारनाथचं दर्शन आणि सापडलेला जादुई क्षण
योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करणार?
योगी निरंजन नाथ यांना बडतर्फ करण्याचा अधिकार आम्हाला नाही, याची वेगळी व्यवस्था असते. आज जी बैठक होईल, त्यामध्ये त्याविषयी निर्णय होईल असं देखील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितलं आहे.