रशिया खवळला! युक्रेनच्या 143 ठिकाणांवर तुफान हल्ले; दोन गावांवरही केला कब्जा

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याचे (Russia Ukraine War) सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची (Vladimir Putin) नुकतीच भेट झाली होती. या बैठकीतही युद्धावर कोणताच तोडगा काढता (Ukraine Crisis) आला नाही. आताही युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्यात वाढ केली आहे. मागील 24 तासांत रशियन सैन्याने युक्रेनच्या डोनेत्स्क भागातील दोन गावांवर कब्जा केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आणि पश्चिम सैन्याच्या मोहिमेत दोन गावांवर कब्जा केला.
मंत्रालयाने सांगितले की रशियन सैन्याने युक्रेनी सैन्य (Ukraine War) औद्योगिक परिसर आणि 143 ठिकाणांवर हल्ले केले. याचबरोबर रशियाच्या वायू रक्षा प्रणालीने मागील आठवड्यात युक्रेनच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हवाई बॉम्ब आणि 160 ड्रोन नष्ट केले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, विश्वासू सहकाऱ्याला पाठवलं भारतात; काय घडलं?
दरम्यान, याआधी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्याशी चर्चा केली. तसेच व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा करण्याची तयारी दाखवली. याबाबत सोशल मीडिया पोस्टद्वारे झेलेन्स्की यांनी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामाफोसा यांच्या विनंतीनुसार त्यांच्याशी मी चर्चा केली. यावेळी मी त्यांना युद्ध थांबवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. रशियाच्या कोणत्याही नेत्याबरोबर बैठकीस तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. परंतु, रशिया मात्र युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करत आहे.
रशियाला आणखी प्रतिबंधांचा इशारा
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प धमकी दिली की जर दोन आठवड्यांत युक्रेनमध्ये शांततापूर्ण तोडगा निघाला नाही तर रशियावर नवीन निर्बंध लागू केले जातील. मागील आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची भेट झाली होती. या भेटीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. यानंतर लगेचच ट्रम्प यांनी रशियाला धमकावण्यास सुरुवात केली आहे.