बांगलादेश हादरला! ढाकामध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

Earthquake in Bangaladesh बांगलादेशमध्ये आज सकाळी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने बांगलादेशी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.

Earthquake : मराठवाड्यात भूकंप! घरांची पडझड, नागरिकांत भीतीचे वातावरण

Earthquake : मराठवाड्यात भूकंप! घरांची पडझड, नागरिकांत भीतीचे वातावरण

4.1 magnitude Earthquake in Bangaladesh Capital Dhaka at early Morning : गेल्या काही दिवसांपासून आंदोलन, हिंसाचार आणि त्यातून झालेला सत्तापालट यासर्व गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज गुरूवार 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सकाळी हे भूकंपाचे धक्के जाणवल्याने बांगलादेशी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.

ढाकामध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये आज गुरूवार 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांनंतर नागरिकांना तात्काळ घराच्या बाहेर काढण्यात आले. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीत हानी टळली आहे. याबबात युरोपीय भू मध्य सागरी भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, या भूकंपाचं केंद्र बांगलादेशमधील नरसिंगडी जिल्ह्याच्या जवळपास 30 किलोमीटरच्या आसपास होते.

Virat Kohli : BCCI नाराज होताच किंग कोहलीचा मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धेत खेळण्यास तयार

या भूकंपाचे धक्के जिल्ह्यातील काही भागांमध्ये जाणवले आहेत. यावर ढाका प्रशासनाने सांगितले की, हे भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या भूकंपामुळे लोक सावध झालेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या भूकंपांवेळी लोक सतर्कतेने वागत आहेत.

तलाठ्याची गरज संपली, डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवणार

त्याचबरोबर भूविज्ञान विशेषज्ञांच्या माहितीनुसार बांग्लादेश हा देश तीन प्रमुख टेक्टोनिक प्लेटोंच्या संगमावर वसलेला आहे. त्यामुळेच या ठिकाणी भूकंपाचा धोका जास्त प्रमाणात असतो. तसेच राजधानी ढाका हे शहर जगातील त्या शहरांपैकी एक आहे. ज्याठिकाणी भूकंपाचा धोका सर्वात जास्त आहे. तसेच धोकादायक जुन्या इमारतींमुळे यामध्ये धोका आणखी वाढतो.

Exit mobile version